उद्या करु... उद्या करु... ही यादी वाढतच चालली आहे.
सकाळी लवकर उठायचय !! उद्या नक्की...
व्यायाम सूरु करायचाय !! उद्यापासून करु...
office मधे ताठ बसणं होत नाही, ते सुरू करायचंय !! उद्यापासून...
बुटकी असली तरी गोड आहे समोर बसणारी मुलगी, निदान ओळख तरी करून घेऊ !! उद्या office ला आल्या आल्या...
स्टेशन वरचा तो आंधळा काय सॉलिड गातो, गिटार पण मस्त वाजवतो. आपण रोज ऐकतो, १ $ टाकायला काय हरकत आहे? १ $ = ३१.५ Rs!! टाकू उद्या...
मॅनेजरला सांगणार आहे - ९ ला येऊन ६.३० ला निघणार म्हणजे निघणारच !! हे पण उद्याच...
डोक्याला काहीच व्यायाम नाही राहिला - आता रोज ३ कोडी सोडवायची !! उद्या शुअर...
चेस साठी मिळालेलं गोल्ड मेडल कुठे ठेवलंय, हे सुद्धा आता आठवत नाही. प्रॅक्टीस पून्हा सुरू करायचिये !! हो हो उद्यापासून...
प्रत्येक वाक्यात स्व:ताची स्तूती होईल असं लिहिणं बंद करायचंय !! बरं उद्यापासून बंद...
कपडे धुवायचेत, ईस्त्री करायचिये !! उद्या उद्या...
ठरवलेली प्रत्येक गोष्ट नेटास न्यायची आहे !! उद्या म्हटलं ना...
आज घाइत होतो म्हणुन !! उद्यापासून सिग्नल नाही मोडणार...
इगो बाळगणे बंद करायचंय, शेवटी त्रास आपल्यालाच होतो !! उद्यापासून अगदी समजूतदार...
चहा सूद्धा बंद !! उद्या केलाच समज...
आणि तो ब्लॉग, तोसूद्धा लिहायचा राहिलाय कधीचा !! उद्या नक्की लिहीणार...
शेवटी काय, तर -
आज करेसो कल कर, कल करेसो परसो...
ऐसी भी क्या जल्दी प्यारे, जब जिना है बरसो...
Sunday, July 20, 2008
Subscribe to:
Posts (Atom)